पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपूर जिल्हा परिषदेत रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
जिल्हा परिषद, नागपूर येथे विधी अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 10 डिसेंबर 2025 ही जरी असली तरी यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


