पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, वस्तू व सेवाकर विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये काही रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
वस्तू व सेवाकर विभागात सेवानिवृत्त राज्यकर अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत काही रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी आस्थापना अधिकारी, अतिरिक्त राज्य कर आयुक्त, परीक्षा हॉल ३ मुंबई, वस्तू आणि सेवा कर विभाग, तळमजला, जी विंग, खोली क्रमांक जी ०३, माझगाव, मुंबई येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://mahagst.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सेवानिवृत्त राज्यकर अधिकारी.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 10 डिसेंबर 2025.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2025.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : आस्थापना अधिकारी, अतिरिक्त राज्य कर आयुक्त, परीक्षा हॉल ३ मुंबई, वस्तू आणि सेवा कर विभाग, तळमजला, जी विंग, खोली क्रमांक जी ०३, माझगाव मुंबई.


