Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

MHADA: म्हाडातील भ्रष्टाचारावर शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल; अधिवेधनात केली सखोल चौकशीची मागणी

MHADA: म्हाडातील भ्रष्टाचारावर शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल; अधिवेधनात केली सखोल चौकशीची मागणी

Shashikant Shinde On MHADA Racket: म्हाडामध्ये संघटित पद्धतीने गैरव्यवहार सुरू असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. बिल्डर आणि संबंधित घटक परस्पर घरे मिळवून ती जास्त दराने विकत असल्याने सामान्यांना न्याय मिळत नसल्याचे त्यांनी विधान परिषदेत ठामपणे मांडले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. विरोधकांकडून मांडल्या जाणाऱ्या सूचनांकडे सत्ताधाऱ्यांनी किमान गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत शिंदे म्हणाले की, दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नसण्याची स्थिती यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नाही. लोकशाही व्यवस्थेसाठी ही बाब चिंताजनक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

गुन्हेगारी वाढल्याचा आरोप

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवत शशिकांत शिंदे यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. कर्जमाफीसंदर्भात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होईल, अशी अपेक्षा असतानाच वास्तव वेगळेच चित्र दाखवत असल्याचे ते म्हणाले. ‘ट्रिपल इंजिन सरकार’ वेगाने काम करत असल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात गुन्हेगारी वेगाने वाढताना दिसत आहे, असा आरोप त्यांनी केला. राज्यात मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असताना गृहखाते नेमके काय करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राजकीय हस्तक्षेपामुळेच गुन्हेगारीचा आलेख चढत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन गेमिंग आणि इतर गुन्ह्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत, मात्र विरोधकांवर कारवाई करण्यात सरकार तत्पर असल्याची टीकाही शिंदे यांनी केली.

हेही वाचा – पुणे ते छत्रपती संभाजीनगर 6 तासांचा प्रवास आता फक्त 2 तासांत! नितीन गडकरींची मोठी घोषणा

अनिल देशमुख प्रकरणावर सवाल

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाचाही उल्लेख करत शिंदे यांनी सरकारवर ‘सत्तेच्या मस्तीचा’ आरोप केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर चांदिवाल समिती नेमण्यात आली, मात्र त्यांचा अहवाल अद्याप का सादर झाला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या प्रतिनिधीला तुरुंगात टाकण्यात आल्याची टीका करत, नंतर त्यांना दिलासा मिळाल्याच्या बातम्या आल्या, असेही ते म्हणाले. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. तसेच संतोष देशमुख प्रकरणात अजूनही एक आरोपी फरार असून, एक वर्ष उलटूनही कारवाई न होणे हे गृहखात्याचे अपयश असल्याचे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी

राज्यातील विविध खात्यांतील काही अधिकारी मनमानी करत असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत, मंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली. जे अधिकारी कामकाजात हलगर्जीपणा करत आहेत, त्यांची बदली करून त्यांना शिस्त लावावी, असेही त्यांनी सुचवले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!