पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ येथे सहाय्यक प्रशासन समन्वयक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पदे भरली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ डिसेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. सदर अर्ज filmcitycao@gmail.com या मेल-आयडीवर पाठवावे लागणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.filmcitymumbai.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


