Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सुवर्णसंधी ! नागपूर महानगरपालिकेत निघाली मेगा भरती; प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

सुवर्णसंधी ! नागपूर महानगरपालिकेत निघाली मेगा भरती; प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

पुणे : नागपूर महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी १८ डिसेंबर, 2025 रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेत प्रशिक्षणार्थी (अग्निशामक विमोचक) यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 100 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशी असेल भरती प्रक्रिया…

– पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (अग्निशामक विमोचक).
– एकूण रिक्त पदे : 100 पदे.

– नोकरीचे ठिकाण : नागपूर
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.

– अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ डिसेंबर २०२५
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य अग्निशमन अधिकारी कायालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळ मजला, महानगरपालिका, सिव्हील लाईन्स नागपूर- ४४०००१

– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : १८ डिसेंबर, २०२५
– मुलाखतीचा पत्ता : मुख्य अग्निशमन अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळ मजला, महानगरपालिका सिव्हील लाईन्स नागपूर- ४४०००१.

– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!