Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! दिग्गज महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! दिग्गज महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

Tejaswini Ghosalkar BJP Entry : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला उत्तर मुंबईत मोठा राजकीय झटका बसला आहे. ठाकरे गटातील प्रमुख महिला नेत्यांपैकी एक असलेल्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आज सकाळी १० वाजता दादर येथील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

तेजस्विनी घोसाळकर या दिवंगत माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. घोसाळकर कुटुंब उत्तर मुंबईतील दहिसर परिसरात शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जाणारा भाग आहे. तेजस्विनी यांच्या भाजप प्रवेशामुळे उत्तर मुंबईत भाजपची ताकद आणखी बळकट होणार असून, ठाकरे गटाच्या स्थानिक राजकारणावर याचा मोठा परिणाम होईल, अशी चर्चा आहे.

या घडामोडीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटासाठी हा सलग धक्का मानला जात असून, भाजपला याचा थेट फायदा होणार आहे.

कोण आहेत तेजस्विनी घोसाळकर?

तेजस्विनी घोसाळकर या मुंबईतील राजकीय व्यक्ती आहेत. त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माजी नगरसेविका असून दहिसर परिसरातील राजकारणात सक्रिय आहेत. त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मधील होत्या आणि पक्षाच्या दहिसर विधानसभा प्रमुख होत्या. तसेच माजी नगरसेवक आणि ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. अभिषेक घोसाळकर यांची फेब्रुवारी २०२४ मध्ये गोळीबारात हत्या झाली होती. घोसाळकर कुटुंबाचा दहिसर-बोरिवली भागात चांगला राजकीय प्रभाव आहे. २०२५ मध्ये घोसाळकर यांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला होता. नंतर पक्षाने समजूत काढली.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!