Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Municipal Corporation Election: पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात लढणार, निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्र्यांनी शड्डू ठोकला

Pune Municipal Corporation Election: पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी विरोधात लढणार, निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्र्यांनी शड्डू ठोकला

 Pune Municipal Corporation Election: निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महापालिकेच्या निवडणुकांची आज घोषणा केली. ताकऱा आणि संपू्र्ण कार्यक्रम जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी राज्यात भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना कशी निवडणूक लढवणार यावर जाहीर भाष्य केलं. यादरम्यान त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. पुण्यात भाजप आमि राष्ट्रवादी वेगवेगळे लढतील असं ते म्हणालेत. याचा अर्थ या दोन्ही पक्षांमध्ये लढत होणार आहे. त्याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी भाजपाची युती जास्तीत जास्त ठिकाणी असेल, असेही म्हटले.

शिवसेना आणि भाजपाची युती

शिवसेना आणि भाजपाच्यायुतीबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘ राज्यात जास्तीत जास्त ठिकाणी शिवसेनेशी भाजपाची युती असेल. त्यांचे कार्यकर्ते आमच्या पक्षात घ्यायचे नाहीत आणि आमचे कार्यकर्ते त्यांनी त्यांच्या सेनेत घ्यायचे नाहीत‘, हे ठरलंय. तर, पुणे आणि पिंपरीत अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्या युतीशी मैत्रीपूर्ण लढत देईल . अजितदादांचा पक्ष आणि आम्ही एकमेकाविरोधात मैत्रीपूर्ण लढू .‘, असे ते म्हणाले.

पुण्यात दोघेही मोठे पक्ष

राष्ट्रवादीसोबत युतीविषयी बोलताना ते म्हणाले, एक दोन ठिकाणी तुम्हाला भाजपा राष्ट्रवादीची युती पाहायला मिळेल. पुण्यात अजित दादा आणि आमची चर्चा झाली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपाने पाच वर्षात पुण्याचा चांगला विकास केला आहे. त्यामुळे पुण्यात कदाचित भाजपा आणि राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसतील‘.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!