Today शनिवार, 24th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद पुन्हा धोक्यात; अजित पवारांच्या भेटीत मोठा निर्णय होणार?

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद पुन्हा धोक्यात; अजित पवारांच्या भेटीत मोठा निर्णय होणार?

Manikrao Kokate and Ajit Pawar : क्रीडा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. नाशिक सत्र न्यायालयाने मंगळवारी (१६ डिसेंबर) १९९५ च्या सदनिका घोटाळा प्रकरणात त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. यापूर्वी प्रथमवर्ग न्यायालयाने फेब्रुवारी २०२५ मध्ये ही शिक्षा सुनावली होती, मात्र अपीलवर तात्पुरती स्थगिती मिळाली होती. आता सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्याने कोकाटे यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर आज (१७ डिसेंबर) मुंबईत माणिकराव कोकाटे अजित पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मंत्रिपदाबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सभागृहात रमी खेळल्याच्या व्हिडीओमुळे वाद झाला तेव्हा अजित पवारांनी कोकाटे यांचे कृषिमंत्रिपद काढून घेऊन क्रीडामंत्रिपद दिले होते. मात्र आता न्यायालयाच्या निकालामुळे नैतिकतेचा मुद्दा उपस्थित होत असून, विरोधकांनी राजीनामा मागितला आहे.

काय आहे सदनिका घोटाळा?

१९९५-९७ दरम्यान नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठी राखीव सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे बंधू यांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. तत्कालीन राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून हा खटला दाखल झाला होता. न्यायालयाने सदनिका वाटप नियमबाह्य असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. कोकाटे यांच्यासह त्यांच्या भावाला प्रत्येकी २ वर्षे कारावास आणि दंडाची शिक्षा कायम झाली आहे.

विरोधी पक्ष एनसीपी (शरद पवार गट) चे रोहित पवार यांनी सरकारवर टीका करत कोकाटेंना तात्काळ पदच्युत करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादीमध्ये मात्र कोकाटेंवर कारवाईचा मतप्रवाह दिसत नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा घेतल्यास पक्षाला फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. कोकाटे उच्च न्यायालयात अपील करणार असून, अभय मागण्याची शक्यता आहे.

या निकालामुळे अजित पवार यांच्यासमोर पुन्हा एकदा आव्हान उभे राहिले आहे. गेल्या वेळीप्रमाणे कोकाटेंना वाचवणार की राजीनामा घेण्यास सांगणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!