Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gautami Patil: गौतमी पाटीलने पुन्हा एकदा बिग बॅासची ऑफर नाकारली; स्वतः केला खुलासा, म्हणाली…

Gautami Patil: गौतमी पाटीलने पुन्हा एकदा बिग बॅासची ऑफर नाकारली; स्वतः केला खुलासा, म्हणाली…

Gautami Patil: बिग बॅास मराठीचे सहावे पर्व काही दिवसातच सुरू होणार आहे. मोठ्या सेलिब्रिटीसह बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नवीन पर्वाचा एक टीझरही प्रदर्शित झाला आहे. सहाव्या पर्वातील संभाव्य स्पर्धेकांची नावे समोर आली आहेत. या नावांमध्ये एक नाव खूप चर्चेत असते. ते म्हणजे महाराष्ट्राची लाडकी ‘सबसे कातील गौतमी पाटील’ बिग बॅासच्या घरात स्पर्धेक म्हणून सहभागी होणार असल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून सांगितले जात होते, यावर आता गौतमीने स्वत: खुलासा केला आहे.

खरंतर गौतमी पाटील हे नाव अख्या महाराष्ट्राला परिचित आहे. तिच्या नृत्याने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली असून, ती वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. लाइव्ह शो, चित्रपटातील आयटम नंबर्स, रिअॅलिटी शो, म्युझिक अल्बमध्ये ती झळकत आहे. त्यामुळे तिची लोकप्रियता वाढत असून, तिच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे. ती बिग बॅास मराठीच्या सहाव्या पर्वात स्पर्धेक म्हणून सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

सहाव्या पर्वामध्ये तिला पाहण्यासाठी चाहते आतुर असले तरी आपण तयार नसल्याचे तिने सांगितले आहे. यामुळे सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे गौतमी या रियालिटी शोचा भाग होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने याविषयी खुलासा केला आहे. बिग बॉसच्या पाचव्या पर्वासाठीही विचारणा झाली होती. पण मी ती नाकारली. कारण मी तीन-चार दिवसांपेक्षा जास्त वेळ आईला सोडून राहूच शकत नाही, असे कारण गौतमीने दिले आहे.

असे असले तरी तिने या रियालिटी शोचे कौतुकही केले आहे. बिग बॉस हा खरं तर खूप मोठा शो आहे, तिथं गेल्यावर कलाकरांना मोठी लोकप्रियता मिळते, प्रसिद्धी मिळते. करिअरसाठीही हा शो महत्त्वाचा असतो, असे ती म्हणाली. लवकरच काही मराठी चित्रपटांमध्ये आणि गाण्यांच्या अल्बममध्ये गौतमी पाटील झळकणार आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!