Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bomb Threats: मुंबई-नागपूरमधील न्यायालयांना बॉम्बच्या धमक्या; राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क, शोधमोहीम सुरू

Bomb Threats: मुंबई-नागपूरमधील न्यायालयांना बॉम्बच्या धमक्या; राज्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क, शोधमोहीम सुरू

Bomb Threats: राज्यातील मुंबई आणि नागपूर येथील अनेक न्यायालयांना गुरुवारी बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल प्राप्त झाल्यानंतर सुरक्षाविषयक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयीन परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून सखोल तपासणी सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई

मुंबईत बॉम्बे उच्च न्यायालय, वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालय, अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालय तसेच फोर्ट येथील न्यायालय संकुलाला धमकीचे ईमेल प्राप्त झाले. या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत न्यायालय परिसराची कसून तपासणी सुरू केली. धमकी पाठवणाऱ्या ईमेल आयडीचा शोध घेण्यासाठी सायबर तपासही सुरू करण्यात आला आहे.

न्यायालय परिसरात घबराट

सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून दुपारी ३ वाजेपर्यंत न्यायालयांचे कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले. बॉम्बे उच्च न्यायालयाचा परिसर रिकामा करण्यात आला असून, बॉम्ब शोधक व नाशक पथकांनी संपूर्ण संकुलाची सविस्तर तपासणी केली. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयालाही त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर बॉम्बची धमकी मिळाली. आयएसआय मद्रास टायगर या नावाने पाठवलेल्या या ईमेलमुळे न्यायालय परिसरात तात्पुरती घबराट पसरली.

हेही वाचा – राज्यातील पाच जिल्हाधिकारी कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पोलिस सतर्क

दरम्यान, धमकीची माहिती मिळताच न्यायालयीन प्रशासनाने त्वरित पोलिसांना कळवले. त्यानंतर नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, पोलीस पथके आणि बॉम्बशोधक पथके घटनास्थळी दाखल होऊन तपास करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या कोणत्याही स्फोटक पदार्थाची पुष्टी झालेली नसली तरी, तपास पूर्ण होईपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!