Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pimpri-Chinchwad: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वाघेरेंनी दिला राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार

Pimpri-Chinchwad: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष वाघेरेंनी दिला राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार

Pune: महापालिका निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

वाघेरे यांनी राजीनामा दिल्यानंतर येत्या एक-दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिली. भाजपने उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का दिला असून, पिंपरी-चिंचवडमधील ठाकरे सेनेची संघटना कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संजोग वाघेरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरे सेनेत प्रवेश केला होता. ठाकरे गटातर्फे त्यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. महायुतीकडून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे त्यांच्यासमोर होते आणि बारणे यांनी पुन्हा विजय मिळवला होता. आता महापालिका निवडणुकीपूर्वीच वाघेरे यांचा भाजप प्रवेश ठाकरे सेनेसाठी मोठा झटका ठरला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी होऊन भाजपची मजबुती वाढण्याची शक्यता आहे. हा प्रवेश भाजपच्या महापालिका निवडणुकीतील रणनीतीचा भाग मानला जात आहे. ठाकरे सेनेतून भाजपकडे जाणाऱ्या नेत्यांची ही साखळी सुरू असून, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!