Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

गडचिरोलीच्या लेकीने जागतिक व्यासपीठावर फडकावला तिरंगा; श्वेता कोवेच्या पराक्रमाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

गडचिरोलीच्या लेकीने जागतिक व्यासपीठावर फडकावला तिरंगा; श्वेता कोवेच्या पराक्रमाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आईनं मोलमजुरी करून वाढवलं. कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. आईचं भक्कम पाठबळ आणि त्याला अथक मेहनत आणि जिद्दीची जोड या जोरावर गडचिरोलीच्या श्वेता कोवे हिनं जगाच्या नकाशावर महाराष्ट्रातील गडचिरोलीचं नाव ‘सुवर्ण’ अक्षरांनी कोरलंय. दुबईतल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये आर्चरी स्पर्धेत तिनं सुवर्ण पदक आणि कांस्य पदकाची कमाई केलीय. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल करणाऱ्या श्वेताचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

दुबई येथे एशियन युथ पॅरा गेम्समध्ये भारतीय स्पर्धकांचा दबदबा दिसून आला. या स्पर्धेत भारतीयांनी गोल्डन कामगिरी केली. शंभरहून अधिक पदकांची कमाई केली. त्यात ३६ सुवर्ण, २८ रौप्य आणि ३८ कांस्य पदकांचा समावेश आहे. याच स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी तथा दिव्यांग खेळाडू श्वेता कोवे ही देखील सहभागी झाली होती. तिनं पॅरा आर्चरी स्पर्धेत सुवर्ण आणि कांस्य पदकाची कमाई केली. तिनं गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि देशाचं नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केलं. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर पोस्टद्वारे अभिनंदन केले. तसेच कौतुकाची थापही दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशात श्वेता कोवेच्या जिद्दीला, परिश्रमांना आणि आत्मविश्वासाला सलाम करत तिचे यश हे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी तसेच राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद केले आहे. दुर्गम भागातून आलेल्या एका मुलीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमकदार कामगिरी करत पदके पटकावणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत कौतुकही केले.

श्वेताच्या वडिलांच्या निधनानंतर आईने मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. तिला सातत्याने प्रोत्साहन दिले. आईच्या पाठबळावर आणि स्वतःच्या अथक मेहनतीवर विश्वास ठेवत श्वेताने जीवनातील अनेक अडचणींवर मात केली. एशियन युथ पॅरा गेम्समध्ये तब्बल १४ देशांच्या खेळाडूंशी स्पर्धा करत तिने सुवर्ण व कांस्य पदकावर नाव कोरले.

भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे श्वेताचे स्वप्न आहे. श्वेता कोवेच्या या यशामुळे दुर्गम व आदिवासी भागातील असंख्य मुला-मुलींना नवी दिशा, आशा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. तिची ही कामगिरी युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!