Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sagar Dhanore Death : काँग्रेस नेत्याच्या पुतण्याची कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या; जालन्यात खळबळ

Sagar Dhanore Death : काँग्रेस नेत्याच्या पुतण्याची कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या; जालन्यात खळबळ

Sagar Dhanore Death : जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात कलावती हॉस्पिटलजवळ रविवारी (२१ डिसेंबर) पहाटे एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह कारमध्ये आढळून आला. मयताचे नाव सागर श्रीराम धानोरे (वय ३५, रा. भवानी नगर, मस्तगड महावितरण कार्यालय परिसर) असे आहे. प्राथमिक तपासात धानोरे यांनी स्वतःच्या उजव्या कानाजवळ देशी बनावटीच्या पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. गोळी आरपार गेली असून, पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.

शनिवारी रात्रीपासून बेपत्ता असलेले सागर धानोरे यांची कार संशयास्पदरीत्या रस्त्याकडे उभी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कारच्या ड्रायव्हिंग सीटवर त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी पोहोचली. पंचनामा पूर्ण करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी रुग्णालय) येथे पाठवण्यात आला आहे.

सागर धानोरे हे प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करीत होते. त्यांच्यावर मारामारीसारखे काही गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पंडितराव धानोरे यांचे पुतणे आहेत. मात्र, सागर हे राजकारणात सक्रिय नव्हते.

देशी बनावटीचे पिस्तूल सापडल्याने ते कसे आणि कुठून आले, याचीही चौकशी सुरू आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस सखोल तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!