Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dream Technologies चा 108MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लवकरच होणार लाँच; अनेक फीचर्सही मिळणार

Dream Technologies चा 108MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन लवकरच होणार लाँच; अनेक फीचर्सही मिळणार

नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यातच आता भारतीय बाजारात लवकरच एक नवीन स्मार्टफोन ब्रँड येण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधील लोकप्रिय नाव असलेल्या ड्रीम टेक्नॉलॉजीजकडून हा फोन आणला जात आहे. हा ब्रँड रोबोट व्हॅक्यूम क्लीनर, ग्रूमिंग उत्पादने आणि इतर अनेक प्रीमियम डिव्हाईसेस बनवतो.

ड्रीम केवळ चीनी बाजारातच नव्हे तर जागतिक बाजारातही आपला स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी स्मार्ट होम अप्लायन्स मार्केटमध्ये लोकप्रिय आहे आणि प्रीमियम उत्पादने बनवत आहे. या कंपनीची बहुतेक उत्पादने डायसन किंमत विभागात येतात. ड्रीम आपला पहिला स्मार्टफोन कधी लाँच करेल याची माहिती समोर आली नसली तरी काही लीक समोर आले आहेत. ब्रँडचा पहिला फोन E1 असण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोनने युरोपियन युनियन एनर्जी लेबल सर्टिफिकेशन मंजूर केले आहे. मॉडेल नंबर W5110 असलेल्या ड्रीम फोनला सर्टिफिकेशन मिळाले आहे. हा फोन ६.६७-इंच AMOLED डिस्प्लेसह येण्याची शक्यता आहे.

तसेच स्क्रीन रिफ्रेश रेटची माहिती अद्याप समोर आली नाही. ड्रीम ई१ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा १०८MP चा असेल, त्यासोबत 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल. कंपनी फ्रंटला ५०MP सेल्फी कॅमेरा देऊ शकते. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!