Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Amar Singh Chahal: ऑनलाइन फसवणूक अन् 12 पानी सुसाईड नोट…! माजी IG अमर सिंग चहल यांचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

Amar Singh Chahal: ऑनलाइन फसवणूक अन् 12 पानी सुसाईड नोट…! माजी IG अमर सिंग चहल यांचा स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न

Amar Singh Chahal: पंजाब पोलिसांचे माजी महानिरीक्षक (आयजी) अमर सिंह चहल हे पटियालामधील त्यांच्या निवासस्थानी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना पटियालातील पार्क रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, अमर सिंह चहल यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल १२ पानांची सुसाईड नोट जप्त केली आहे. या नोटमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक झाल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचा उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिसांनी कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सखोल तपास केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. यासोबतच कुटुंबीयांसह संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – Farmer Suicide in Maharashtra: शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ; 11 महिन्यात मराठवाडा अन् विदर्भात आत्महत्येचा धक्कादायक आकडा समोर

डीजीपींकडे कुटुंबियांचे आवाहन

अमर सिंह चहल यांच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की ते मोठ्या ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरले असून त्यात सुमारे ८ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या संदर्भात त्यांनी १२ पानांच्या सुसाईड नोटमध्ये सविस्तर उल्लेख केला असून पंजाबच्या डीजीपींना पत्र लिहून या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – Sagar Dhanore Death : काँग्रेस नेत्याच्या पुतण्याची कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या; जालन्यात खळबळ

फरीदकोट गोळीबार प्रकरणाशी संबंध

अमर सिंह चहल हे २०१५ मधील फरीदकोट गोळीबार प्रकरणातील आरोपी आहेत. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी, एडीजीपी एल.के. यादव यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने फरीदकोट न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात अमर सिंह चहल यांच्यासह पंजाबमधील अनेक प्रमुख राजकारण्यांची नावेही समाविष्ट असल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेमुळे पंजाबमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!