Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Vishwas Nandekar: शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला; माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे दुःखद निधन

Vishwas Nandekar: शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला; माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे दुःखद निधन

Vishwas Nandekar: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना जरी वेग आला असला तरी शिवसेनेतून मात्र एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे तरुण, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचे दुःखद निधन झाले आहे.

मुंबईतील लीलावती रुग्णालयात ते उपचार घेत होते आणि उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात तसेच यवतमाळ जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विश्वास नांदेकर यांच्यावर गेल्या महिनाभरापासून मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी अतोनात प्रयत्न सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ डिसेंबर रोजी रुग्णालयात जाऊन विश्वास नांदेकर यांची भेट देखील घेतली होती. त्या वेळी त्यांनी नांदेकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांकडून त्यांच्या उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली होती. त्या भेटीदरम्यान नांदेकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील दिसून येत होते.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे विश्वास नांदेकर यांनी केले होते. शिवसेनेतून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली होती. तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा कठीण प्रवास हा कायम प्रेरणादायी ठरला. आक्रमक शिवसैनिक म्हणून देखील त्यांची ओळख होती.

विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्यावर चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा क्षेत्राच्या समन्वयकपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती. मात्र त्या शस्त्रक्रियेनंतर त्यांची तब्येत अधिकच बिघडत गेली आणि प्रकृती जास्तच खालावली. अखेर उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!