Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Latur News: पराभूत उमेदवाराकडून वृद्ध महिलेला मारहाण; काँग्रेस नेत्याने व्हिडीओ केला ट्वीट, रेणापूरातील गंभीर प्रकाराने खळबळ

Latur News: पराभूत उमेदवाराकडून वृद्ध महिलेला मारहाण; काँग्रेस नेत्याने व्हिडीओ केला ट्वीट, रेणापूरातील गंभीर प्रकाराने खळबळ

Latur News: नुकताच राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत विजयाचा गुलाल लावलेल्या विजयी उमेदवारांनी जल्लोषात विजयीउत्सुव साजरा केला. तर दुसरीकडे पराजय झालेल्यांसाठी ही निवडणूक मोठा धक्का देणारी ठरली. कोणतीही निवडणूक असो त्यात हार जीत असतेच. पराभूत झाले तर पुन्हा उभारी घेऊन लढण्यासाठी सज्ज राहायचे असते. पण रेणापूर येथील नगरपंचायत निवडणुकीच्या निकालनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

रेणापूर येथे पराभूत भाजप उमेदवाराने नगरपंचायत निवडणुकीत मला मतदान केले नाही म्हणून एका वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी पोस्ट लिहून या घटनेचा निषेध नोंदविला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. अशा प्रकारच्या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आणि लोकशाही मूल्यांना घातक ठरणाऱ्या आहेत, असे पोस्टमध्ये धीरज देशमुख यांनी म्हटले आहे. दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक शिक्षा करावी, अशी मागणही धीरज देशमुख यांनी पोस्टमध्ये केली आहे.

रेणापूर येथे पराभूत भाजप उमेदवाराने नगरपंचायत निवडणूकीत “मला मतदान का केले नाही” या कारणावरून एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं?

वृद्ध महिलेच्या म्हणण्यानुसार, मतदान दिले नाही म्हणून मधून आले आणि मला मारायला चालू केले. उत्तम चव्हाण, असे महिलेने नावही घेतले आहे. महिलेला संबंधिताने धमकीही दिली असल्याचा आरोप केला आहे. ‘हिला खल्लासच करू’ अशी धमकी दिली होती. मतदान का केले नाही याचा जाब ज्यावेळी महिलेला विचारण्यात आला. त्यावर महिलेने २०५ मतदान पडले ते उगच पडले का? असा प्रश्न केला. त्यानंतर पुन्हा मारहाण करण्यास सुरुवात केली. मला बोलता पण येत नव्हते, काहीच करता येत नव्हते, असा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी रेणापूर पोलीस स्थानकात महिलेने तक्रार दिल्याची माहिती मिळत आहे. पारूबाई बाबू राठोड असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणात पोलीस कोणती कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!