पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे उप-अभियंता या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर २०२५ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे. 65 वर्षांपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, त्यासाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी, आस्थापना विभाग मुख्य कार्यालय, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सदर नागपूर-440001 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.nmrda.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : उप-अभियंता.
– रिक्त पदे : 01 पदे
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– वयोमर्यादा : 65 वर्षापर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : ३० डिसेंबर २०२५.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य प्रशासकीय अधिकारी, आस्थापना विभाग मुख्य कार्यालय, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सदर नागपूर -440001.


