Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्याच्या भावी ‘खा’जदाराला जुलाब लागला, खुमखुमी असेल तर…; अमोल मिटकरींचा प्रशांत जगतापांवर जोरदार हल्लाबोल

पुण्याच्या भावी ‘खा’जदाराला जुलाब लागला, खुमखुमी असेल तर…; अमोल मिटकरींचा प्रशांत जगतापांवर जोरदार हल्लाबोल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य युतीवरून शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मिटकरींनी सोशल पोस्ट करत जगताप यांना पुण्याचे माजी महापौर म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “अजितदादांच्या पुण्याईने विविध पदांवर पुण्यात शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोअर कमिटी व ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाने चांगलाच जुलाब लागलाय, असं त्यांनी म्हटले आहे.

तसेच, मागच्या काळात राजकीय संन्यास घेणार, राजीनामा देणार अशा वल्गना करत निष्ठावंत वगैरे बिरुदावली चढवत भावी खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या उपटसुंभाचा पीळ स्वभावाप्रमाणे कायम राहणार यात शंका नाही. खरंच पुण्यात स्वतःचं अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वतःचा एखादा पक्ष काढ की बाबा #पुण्याचाभावी ‘खाज’दार, अशी खोचक टीका मिटकरी यांनी केली आहे.

ही टीका पुणे मनपा निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आली आहे. प्रशांत जगताप यांनी युतीला सुरुवातीला विरोध केला होता आणि त्यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केल्याची माहिती मिळत आहे. जगताप यांनी युतीमुळे शरद पवार गटाचे नुकसान होईल, असे मत व्यक्त केले होते.

दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी युतीबाबत अधिकृत प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर काही नेत्यांनी तत्त्वतः युतीचा निर्णय झाल्याचे संकेत दिले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा निवडणुकीत ही युती महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीला मजबूत करू शकते, अशी चर्चा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!