Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर तीन महिने राहणार बंद; काय आहे कारण?

Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिर तीन महिने राहणार बंद; काय आहे कारण?

भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील तीन महिने भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार आहे. २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवारी (२३ डिसेंबर) आंबेगाव-जुन्नरचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला. स्थानिक ग्रामस्थांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. प्रशासकीय अधिकारी आता भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थांचे मत आणि बैठकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर मंदिर बंद करण्याची तारीख निश्चित होईल. काही अहवालांनुसार, १ जानेवारी २०२६ पासून बंदी लागू होण्याची शक्यता आहे.

कुंभमेळ्यादरम्यान भाविकांच्या सोयी-सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनासाठी शासनाने २८८.१७ कोटी रुपयांच्या विस्तृत विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. या आराखड्यात मुख्य मंदिराच्या सभामंडपाचे नूतनीकरण, इतर सोयी-सुविधा यांचा समावेश आहे. विकासकामांना गती देण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर बंद ठेवणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

बैठकीला खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, तहसीलदार प्रशांत बेडसे व सचिन वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार, पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक विलास वाहणे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे, सरपंच दत्तात्रेय हिले व सविता तिटकारे तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

वर्षभर देशभरातून लाखो भाविक, पर्यटक आणि निसर्गप्रेमी भीमाशंकरला भेट देतात. नवीन वर्षात दर्शनाचे नियोजन असल्यास भाविकांनी लवकरात लवकर दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!