Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: सिंहगड पायथ्याशी थरार! खानापुरात भरदिवसा ‘फिल्मी’ स्टाईल दरोडा; 1 कोटींचे सोने लंपास

Pune Crime: सिंहगड पायथ्याशी थरार! खानापुरात भरदिवसा ‘फिल्मी’ स्टाईल दरोडा; 1 कोटींचे सोने लंपास

Pune Crime: सिंहगड परिसरातील खानापूर भागात शुक्रवारी भरदिवसा एका धाडसी दरोड्याची घटना घडली. पाच सशस्त्र दरोडेखोरांनी पानशेत रस्त्यावरील ‘वैष्णवी ज्वेलर्स’ या दुकानावर हल्ला करत सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने लुटले. या घटनेने संपूर्ण हवेली तालुक्यात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नेमकी घटना काय?

दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२:३० च्या सुमारास, जेव्हा दुकानाचे मालक श्री. बाबर हे त्यांचा मुलगा आणि महिला कर्मचाऱ्यांसह दुकानात होते, तेव्हा दोन दुचाकींवरून पाच तोंडाला रुमाल बांधलेले तरुण तिथे आले. दुकानात शिरताच दरोडेखोरांनी हातात कोयते उपसून सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. अत्यंत सराईतपणे या टोळीने दुकानातील काचेच्या कपाट फोडून त्यातील ७५ ते ८० तोळे सोन्याचे दागिने पिशव्यांत भरले. अवघ्या दोन मिनिटांच्या आत हे दरोडेखोर पानशेतच्या दिशेने पसार झाले.

हेही वाचा – Pune Cyber Crime: सायबर चोरीची आणखी एक घटना; सीबीआय कारवाईची भीती दाखवून जेष्ठ महिलेची 1 कोटी 19 लाखांची फसवणू

सीसीटीव्हीमध्ये कैद झाला दरोड्याचा थरार

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात दरोडेखोरांचा हैदोस स्पष्ट दिसत आहे. काहींनी दागिने भरण्याचे काम केले, तर एक जण शस्त्राचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना जागेवरच रोखून धरताना दिसत आहे. यावरून दरोडेखोरांनी दुकानाची आधी ‘रेकी’ केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा –

तपास आणि सुरक्षा प्रश्न

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींच्या मार्गाचा माग काढला जात आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या मार्गावर अशा प्रकारे सशस्त्र दरोडा पडल्याने खडकवासला आणि सिंहगड परिसरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!