Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कोल्‍हापुरात कॉंग्रेसने थोपवली बंडखोरी; बंटी पाटलांची जोरदार तयारी

कोल्‍हापुरात कॉंग्रेसने थोपवली बंडखोरी; बंटी पाटलांची जोरदार तयारी

कोल्हापूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय पक्षांकडून सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवारांच्या यादीवरून अजूनही तिढा कायम आहे. बंडखोरीची भीतीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी विलंब होत आहे. मात्र, असे असताना काँग्रेसकडून कोल्हापूर बंडखोरी थोपवित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी सर्वात आधी जाहीर करून षड़्डू ठोकला आहे. काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी त्यांच्या एक्‍स या सोशल मीडियावर काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाबरोबर चर्चेत असलेल्या जागा समाविष्ट नाही.

उमेदवारांची यादी लवकर जाहीर केल्यास बंडखोरी होण्याची शक्यता असते. मात्र, काँग्रेसच्या या पावित्र्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांवरही लवकर उमेदवार घोषित करण्याचा दबाव वाढणार आहे. काँग्रेसने कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सर्वात आधी यादी जाहीर केल्याने पक्षाने निवडणुकीची तयारी गांभीर्याने घेतली असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, कोल्हापूर महापालिकाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून ठाकरेसेनेशी चर्चा सुरू असून लवकरच दोन पक्षांमध्ये जागावाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!