नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. त्यात आता 10000mAh बॅटरी असलेले फोन बाजारात येणार आहेत. २०२६ मध्ये अनेक फोनच्या बॅटरी लाईफमध्ये क्रांतिकारी बदल दिसून येतील. आतापर्यंत बहुतेक स्मार्टफोनमध्ये वारंवार चार्जिंगचा त्रास होत होता, परंतु २०२६ पर्यंत, बहुतेक स्मार्टफोनमध्ये 10000mAh बॅटरी दिली जाणार आहे.
Honor, Realme आणि इतर ब्रँड देखील यावर काम करत आहेत. Realme चा 10000mAh बॅटरी असलेला फोन चर्चेत आहे. कंपनीने आधीच त्याची माहिती देऊ केली आहे आणि आता मोठ्या बॅटरीचा फोन लाँच केला जाईल. यापूर्वी, कंपनीने Realme GT ७ हा एक खास फोन लाँच केला होता, जो 10000mAh बॅटरी असलेला कॉन्सेप्ट फोन होता. 10001mAh बॅटरी असलेल्या Realme फोनची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. हा फोन मॉडेल क्रमांक RMX5107 सह व्हायरल होत आहे. त्याची माहिती अबाउट डिव्हाइस पेजवर देण्यात आली आहे. त्यानुसार, हा फोन Realme UI 7.0 वर चालेल, जो Android 16 वर आधारित असेल.
Realme UI 7.0 ची घोषणा कंपनीने गेल्या महिन्यात केली होती, परंतु तो अद्याप रोल आउट झालेला नाही. टेलिग्रामवर व्हायरल होत असलेल्या या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. फोनमध्ये 10001mAh बॅटरी असल्याचे दिसून येते. Honor ही 10000mAh बॅटरी असलेला फोन देखील लाँच करत आहे. कंपनी 5 जानेवारी रोजी चीनमध्ये त्यांचा Honor Power 2 लाँच करणार आहे.


