Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sanjay Raut : अजित पवारांनी मूळ राष्ट्रवादीत यावं…; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut : अजित पवारांनी मूळ राष्ट्रवादीत यावं…; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut : राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील भाजप नेत्यांवर ‘सत्तेचा उन्माद’ आणि ‘धमकावण्याचे राजकारण’ केल्याचा घणाघाती आरोप केल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. अजितदादांच्या या पवित्र्यावरून आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी टोलेबाजी करत, दादांना थेट शरद पवारांच्या सावलीत परत येण्याचे आवाहन केले आहे.

‘सत्तेचा माज आलाय’, अजित पवारांचा स्वकीयांवरच प्रहार

पिंपरी-चिंचवडमधील एका सभेत बोलताना अजित पवारांनी भाजपवर तोफ डागली. आम्हीही दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता पाहिली, पण कधी सत्तेचा माज केला नाही. मात्र, आता उमेदवारी मागे घेण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले. महायुतीत एकत्र असतानाही दादांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सत्तेत ‘मांडीला मांडी’ लावून बसणाऱ्या नेत्यांमध्ये मोठी दरी असल्याचे समोर आले आहे. अजित पवारांच्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी दादांना चिमटा काढला. राऊत म्हणाले की, जर तुम्हाला भाजप सत्तेचा माज आलेला वाटत असेल, तर त्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कशाला बसताय? बाहेर पडा! इतकेच नव्हे तर राऊतांनी दादांना एक पाऊल पुढे जाऊन सल्ला दिला की, भाजपची साथ सोडा आणि मूळ राष्ट्रवादीत म्हणजेच शरद पवार यांच्याकडे परत या. शेवटी मूळ पक्ष त्यांचाच आहे.

‘वॉशिंग मशीन’ आणि भ्रष्टाचारावरून हल्लाबोल

भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा ‘वॉशिंग मशीन’चा संदर्भ दिला. भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे आणि अमित शहा हे वॉशिंग पावडर. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते या मशीनमध्ये गेले की स्वच्छ होऊन बाहेर पडतात, असे राऊत म्हणाले. पंतप्रधानांनी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेले अजित पवार आणि ‘आदर्श’ घोटाळ्याचे नाव असलेले अशोक चव्हाण आठ दिवसात भाजपसोबत कसे गेले? असा सवाल करत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

राजकीय अर्थ आणि संकेत

अजित पवारांची भाजपवरील ही नाराजी आणि संजय राऊतांनी दिलेली ‘घरवापसी’ची साद, यामुळे आगामी काळात महायुतीमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अजित पवार नवा मार्ग शोधत आहेत का? अशा चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!