Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Team India Squad: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे सोपवण्यात आली कर्णधार पदाची धुरा

Team India Squad: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे सोपवण्यात आली कर्णधार पदाची धुरा

Team India Squad: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी ३ सामन्यांच्या एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नियमित कर्णधार शुभमन गिल याचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकला होता, परंतु आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित करण्यात आले असून तोच या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. गिलच्या अनुपस्थितीत केएल राहुलने कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.

या संघात स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या हे दोन्ही खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कोहलीने ३०२ धावा फटकावून ‘मॅन ऑफ द सीरिज’चा किताब पटकावला होता. दुसरीकडे, रोहित शर्मानेही सलग दोन अर्धशतके झळकावून आपला फॉर्म सिद्ध केला आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धही या अनुभवी जोडीकडून मोठ्या धावांची अपेक्षा चाहत्यांना आहे. संघात ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना स्थान मिळाले असले तरी श्रेयस अय्यरच्या उपलब्धतेबाबत अद्याप संभ्रम आहे. अय्यरला अद्याप बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सकडून फिटनेस प्रमाणपत्र मिळालेले नाही. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल, अशी आशा निवडकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धची भारतीय टीम: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल.

मालिकेचे वेळापत्रक

न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका ११ जानेवारी रोजी वडोदरा येथून सुरू होईल. मालिकेतील दुसरा सामना १४ जानेवारी रोजी राजकोट येथे, तर तिसरा आणि अंतिम सामना १८ जानेवारी रोजी इंदूरमध्ये खेळवला जाणार आहे. कर्णधार म्हणून शुभमन गिलचे पुनरागमन आणि रोहित-विराटची जोडी यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये या मालिकेबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!