Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sikandar Shaikh Accident: पैलवान सिकंदर शेखच्या कारला भीषण अपघात! बक्षिसात मिळालेल्या ‘थार’चा चक्काचूर

Sikandar Shaikh Accident: पैलवान सिकंदर शेखच्या कारला भीषण अपघात! बक्षिसात मिळालेल्या ‘थार’चा चक्काचूर

Sikandar Shaikh Accident: महाराष्ट्राचा लाडका कुस्तीपटू, ‘महाराष्ट्र केसरी’ आणि ‘हिंदकेसरी’ विजेता पैलवान सिकंदर शेख याच्या गाडीला सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सीमेवर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. सांगोला-मिरज महामार्गावर हा अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, सिकंदर शेखच्या ‘थार’ (Thar) गाडीचा पुढचा भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या मोठ्या अपघातातून पैलवान सिकंदर शेख सुदैवाने सुखरूप आणि बालंबाल बचावला असून त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.

कुस्तीच्या मैदानात अनेक नामांकित मल्लांना आस्मान दाखवून मानाची गदा आणि थार गाडी पटकावणारा सिकंदर शेख हा आपल्या खाजगी कामानिमित्त सांगोला-मिरज मार्गावरून प्रवास करत होता. प्रवास दरम्यान अचानक वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

बक्षिसाची ‘थार’ अपघातात थेट मोडीत
विशेष आणि हळहळ व्यक्त करणारी बाब म्हणजे, ज्या कारचा हा भीषण अपघात झाला, ती महिंद्रा थार गाडी सिकंदर शेख याला एका प्रतिष्ठेच्या कुस्ती मैदानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल बक्षीस म्हणून मिळाली होती. अपघातात या गाडीचे अतोनात नुकसान झाले असून गाडीच्या डाव्या आणि समोरील भागाचा पत्रा पूर्णपणे चेपला गेला आहे.

चाहत्यांची घटनास्थळी धाव आणि सुटकेचा श्वास
सिकंदर शेखच्या गाडीच्या अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच सांगोला परिसरातील स्थानिक नागरिक आणि त्याच्या हजारो कुस्तीप्रेमी चाहत्यांनी तातडीने महामार्गावरील घटनास्थळाकडे धाव घेतली. सिकंदर पूर्णपणे सुरक्षित असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. सिकंदर शेख हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरातील कुस्ती क्षेत्रात आदराने घेतले जाणारे आणि प्रचंड लोकप्रिय नाव आहे. या अपघातामुळे पश्चिम महाराष्ट्रातील क्रीडा वर्तुळात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!