Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यासह राज्यात FDAचा कारवाईचा बडगा; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त, कंपनी सील

पुण्यासह राज्यात FDAचा कारवाईचा बडगा; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त, कंपनी सील

मुंबई : राज्यात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू व हुक्का उत्पादनांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिल्यानंतर FDA अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. आदेशांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, याचा आढावा घेत राज्यभर कारवायांचा बडगा उगारण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील टाकवे येथे असलेल्या ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. लि.’ या कंपनीवर FDAने छापा टाकून तब्बल 31 कोटी 67 लाख 21 हजार 987 रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कंपनीच्या परिसराला सील ठोकण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही कारवाई 2 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली. त्याआधी 1 डिसेंबर 2025 रोजी कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालात या नमुन्यांमध्ये ‘निकोटिन’ पॉझिटिव्ह आढळून आले. हे उत्पादन मानवी आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट झाले असून, महाराष्ट्र शासनाने 16 जुलै 2025 रोजी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे हे सरळ उल्लंघन असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

कारवाईदरम्यान विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चा माल आणि फ्लेवर्सचा साठा असा एकूण 31.67 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अनिल कुमार चौहान (असिस्टंट मॅनेजर), असिफ फाजलानी (संचालक), फैजल फाजलानी (संचालक) आणि ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. लि.’ या कंपनीविरोधात भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे 31 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या 19.45 कोटींच्या कारवाईचा धागा पकडून पुणे FDAने ही मोठी साखळी उघडकीस आणली आहे. या सलग कारवायांमुळे प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व हुक्का माफियांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभिजित सुभाष देशमुख करत आहेत.

याशिवाय, जळगाव जामोद येथे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तपासणी नाक्यावर वनविभागाने मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा सुमारे 75 लाख रुपयांचा विमल गुटखा व पान मसाला जप्त केला आहे.

तसेच, भिवंडीतील दापोडे परिसरात ‘मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी’ या गोदामावर 30 डिसेंबर 2025 रोजी FDAने छापा टाकून 19 कोटी 45 लाख 76 हजार 320 रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त केला होता. ‘अफजल’ ब्रँडच्या नमुन्यांमध्ये निकोटिन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली होती.

झिरवाळ यांचा इशारा
राज्यात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू व हुक्का उत्पादनांचे उत्पादन, साठवणूक किंवा विक्री करताना कोणीही कायद्याचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर याच प्रकारे कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!