Today शनिवार, 7th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Weather : राज्यात हवामानाचा लहरी खेळ; कुठे गारठा तर कुठे ढगाळ वातावरण, अवकाळी संकटाची शक्यता

Maharashtra Weather : राज्यात हवामानाचा लहरी खेळ; कुठे गारठा तर कुठे ढगाळ वातावरण, अवकाळी संकटाची शक्यता

मुंबई : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील हवामानात बदल पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली असून काही भागांत ढगाळ वातावरण कायम आहे. 5 जानेवारी रोजीही महाराष्ट्रातील विविध भागांत गारठा, धुके आणि ढगाळ हवामान अशी संमिश्र परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणात हलक्या धुक्यासह ढगाळ वातावरण

मुंबईसह संपूर्ण कोकण विभागात हलक्या धुक्यासह ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. वातावरणातील गारठा काहीसा कमी जाणवेल. किमान तापमान सुमारे 19 अंश तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून रायगड, रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतही अशीच स्थिती राहणार आहे.

उत्तर महाराष्ट्रात सकाळी दाट धुके

नाशिक, जळगाव, धुळे आणि अहिल्यानगर भागात सकाळी दाट धुके पडण्याची शक्यता असून दिवसभर आकाश निरभ्र राहील. किमान तापमान 12 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची, तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात गारठा कमी होण्याची शक्यता

या भागात किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची चिन्हे असून गारठा कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यात धुक्यासह थंडी जाणवेल. सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत मात्र गारठा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मराठवाड्यात ढगाळ वातावरण

मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही भागांत आकाश स्वच्छ राहील. गारठ्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. 5 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमान सुमारे 15 अंश तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

विदर्भात बहुतांश ठिकाणी हवामान स्वच्छ

विदर्भात बहुतांश ठिकाणी हवामान स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. अमरावतीत किमान तापमान 14 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

एकूणच राज्यात काही भागांत गारठा तर काही भागांत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामानातील बदलांकडे लक्ष देण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!