Today मंगळवार, 30th जून 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Laxman Hake: पवार फॅमिली पुन्हा एकत्र येणार! लक्ष्मण हाकेंचा सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांबाबत मोठा दावा

Laxman Hake: पवार फॅमिली पुन्हा एकत्र येणार! लक्ष्मण हाकेंचा सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांबाबत मोठा दावा

Laxman Hake: ‘पवार कुटुंब कधीही फुटलेले नव्हते आणि भविष्यातही ते एकत्रच राहतील. निवडणुकांचे निकाल लागताच सुप्रिया सुळे केंद्र सरकारमध्ये मंत्री पदावर दिसतील, तर रोहित पवार यांची राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असे भाकीत लक्ष्मण हाके यांनी वर्तवले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. अजित पवारांच्या कार्यशैलीवर तोफ डागताना हाके म्हणाले की, पुण्यात तिकीट वाटप करताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना झुकते माप दिले जात आहे. एकीकडे पुरोगामी नाव घ्यायचे आणि दुसरीकडे गुन्हेगारांना जवळ करायचे, हे अजित पवारांचे दुटप्पी राजकारण आहे. सत्ता आल्यावर भूखंड हडप करणे हाच त्यांचा अजेंडा असतो. ते जनतेचे सेवक नसून अदानींप्रमाणे केवळ एक व्यावसायिक आहेत, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

शरद पवारांचे मोदी-शाहांशी थेट ‘कनेक्शन’

शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना हाके म्हणाले की, पवारांचे बोलणे आणि वागणे यात मोठी तफावत आहे. पवार साहेब राज्यातील भाजप नेत्यांना जुमानत नाहीत, कारण त्यांचे थेट संबंध पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी आहेत. ते भाजपसोबत जाणार नाही असे म्हणत असले, तरी पडद्यामागे सूत्रे वेगळीच हालतात, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Laxman Hake on Ajit Pawar : फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन गुंडांच्या घरात तिकीट वाटप; अजित पवारांवर लक्ष्मण हाकेंचा घणाघाती हल्ला

दरम्यान, भाजपवर टीका करताना लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांच्या अस्वस्थतेवर बोट ठेवले. भाजप स्वतःला ‘गंगा’ म्हणते, पण त्यांनी अजित पवारांसारखी भ्रष्टाचाराची गटारगंगा स्वतःमध्ये सामावून घेतली आहे. ज्यांच्या विरोधात लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्त आटवले, त्यांनाच सत्तेत बसवल्यामुळे भाजपचा सामान्य कार्यकर्ता आज प्रचंड नाराज आहे, असे ते म्हणाले.

कार्यकर्ता वाऱ्यावर, गुंडगिरीचा बोलबाला

राज्यातील सध्याच्या युत्यांवर भाष्य करताना हाके यांनी याला ‘खेळखंडोबा’ संबोधले. सगळेच पक्ष एकमेकांशी छुपे साटेलोटे करून बसले आहेत. ठाकरे-मनसे जवळ येत आहेत, काँग्रेस-वंचितची चर्चा सुरू आहे. या गोंधळात निष्ठावान कार्यकर्ता बाजूला फेकला गेला असून, आगामी निवडणुका केवळ पैसा आणि बाहुबलाच्या जोरावर लढल्या जातील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!