पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड येथे स्टाफ नर्स/एल.एच.व्ही. (पुरुष), स्टाफ नर्स (पुरुष), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, कीटकशास्त्रज्ञ (बीपीएचयू), सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (बीपीएचयू), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (बीपीएचयू), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (एनटीईआर), जिल्हा कार्यक्रम समन्वयक (आशा आणि ईएमएस), जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक, सीपीएचसी सल्लागार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक (एनपीसीडीसीएस), रुग्णालय व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक (एनटीईपी), जिल्हा साथरोग विशेषज्ञ, आयुष सल्लागार, नेत्रतज्ञ, दंत तंत्रज्ञ, दंत आरोग्यतज्ञ, फिजिओथेरपिस्ट, श्रवणशास्त्रज्ञ, दंतवैद्य, फार्मासिस्ट, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी (महिला) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला रायगड येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 154 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२६ ही असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zpraigad.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


