Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC Election: मुख्यमंत्री मांडणार पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’; ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक घेणार देवेंद्र फडणवीसांची विशेष मुलाखत

PMC Election: मुख्यमंत्री मांडणार पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’; ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक घेणार देवेंद्र फडणवीसांची विशेष मुलाखत

PMC Election: पुणे शहराच्या राजकारणात सध्या महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असताना, भारतीय जनता पक्षाने प्रचारासाठी ‘ग्लॅमर’ आणि ‘विकास’ यांची सांगड घातली आहे. येत्या रविवारी (११ जानेवारी) पुण्यात एका विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, या सोहळ्यात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक ही मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेताना पाहायला मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा मेगा इव्हेंट, पुण्याच्या घराघरात पोहचणार आवाज

भाजपचे राज्य सरचिटणीस राजेश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘संवाद पुणेकरांशी’ हा कार्यक्रम केवळ एका मैदानापुरता मर्यादित राहणार नाही. पुण्यातील सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये अवाढव्य स्क्रीन लावून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) केले जाईल. एकाच वेळी तब्बल ५ लाख पुणेकर या संवादात डिजिटल माध्यमातून जोडले जाणार आहेत, असा भाजपचा दावा आहे.

हेही वाचा – Girija Oak Blue Saree: गिरीजा ओक निळ्या साडीमुळे रातोरात चर्चेत; नेमकी भानगड काय आहे?

‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक घेणार मुलाखत

सोशल मीडियावर आपल्या निळ्या साडीतील लूकने तरुणाईला भुरळ घालणारी ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक आता राजकीय मैदानात मुलाखतकाराच्या भूमिकेत उतरणार आहे. याआधी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ठाण्यात मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता, आता तीच जबाबदारी पुणेकरांच्या वतीने गिरीजा पार पाडणार आहे. पुणेकरांच्या मनातील प्रश्न आणि शहराच्या समस्यांबाबत ती मुख्यमंत्र्यांना बोलते करणार आहे.

हेही वाचा – Girija Oak: गिरिजा ओकच्या सौंदर्यावर इम्रान हाश्मी फिदा; विमानावर तिला पाहिलं अन्.. प्रसिद्ध दिग्दर्शिकेन उलगडला ‘तो’ किस्सा

कार्यक्रमाचे महत्त्वाचे तपशील

विषय: ‘संवाद पुणेकरांशी’ (शहराचा सर्वांगीण विकास)
प्रमुख उपस्थिती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुलाखतकार: अभिनेत्री गिरीजा ओक
दिनांक व वेळ: रविवार, 11 जानेवारी 2026 | सायंकाळी 7:00 वाजता
ठिकाण: शुभारंभ लॉन्स, डीपी रोड, एरंडवणे, पुणे

या सोहळ्याच्या निमित्ताने भाजप आपल्या ‘घर चलो’ या महासंपर्क अभियानाची सुरुवात करणार आहे. केवळ दोन दिवसांत पुण्यातील १० लाख घरांमध्ये भाजपचा निवडणूक जाहीरनामा म्हणजेच ‘संकल्पनामा’ पोहोचवण्याचे मोठे लक्ष्य पक्षाने ठेवले आहे. पुण्याचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक विकास यांचा समतोल साधणारा ‘रोडमॅप’ मुख्यमंत्री या कार्यक्रमात मांडतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!