Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Girija Oak Blue Saree: गिरीजा ओक निळ्या साडीमुळे रातोरात चर्चेत; नेमकी भानगड काय आहे?

Girija Oak Blue Saree: गिरीजा ओक निळ्या साडीमुळे रातोरात चर्चेत; नेमकी भानगड काय आहे?

मराठी अभिनेत्री गिरीजा ओक सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनली आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये गिरीजाने निळ्या रंगाची साडी नेसली होती. तिचे एका बाजूने मोकळे केस, नो मेकअप लूक, या सर्वाने लोकांना ती खूपच आवडली. गिरीजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे गिरीजाची ओळख आता मराठी सिनेसृष्टीपर्यंत मर्यादीत राहिली नाही. तर, ती तिच्या कामगिरीपेक्षा राष्ट्रीय स्तरावर लोकांपर्यंत तिची ओळख वाढेल असं दिसत आहे.

लल्लनटॉप या हिंदी डिजिटल वृत्तसंस्थेला गिरीजा ओक मुलाखत देत होती. संपादक सौरभ द्विवेदी हे तिची मुलाखत घेत होते. त्यात ती तिच्या कॉलेजमधला मजेदार किस्सा सांगत होती. फिजिक्स प्रोफेसर बोलताना कसे चुकेचे बोलून गेले, त्यावर क्लासमधली परिस्थीती यासर्वांवर दोघे हसत होते. तिचा सांगण्याचा लेहेजा, तिचा लूक, प्रेक्षकांना फार आवडला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर सगळीकडे तिची चर्चा आहे.

तो’मजेशीर किस्सा

व्हायरल व्हिडिओमध्ये गिरीजा हिनं कॉलेजती एक मजेदार किस्सा सांगितला आहे. गिरीजा म्हणाली, ‘माझा फिजिक्स प्रोफेसर होता. त्यांनी आम्हाला विचारले, ‘What are babes?’. आम्ही सगळे थक्क झालो, नेमकं सरांना काय झालं, यामुळे आम्ही सगळे गोंधळून गेलो होतो. त्यांनी मग दुसऱ्या विद्यार्थ्याकडे बघून उत्तर देण्यास सांगितले. तोही शांत होता. मग त्यांनी एका मुलीला विचारले, ‘What are babes?’ आम्ही फक्त त्यांच्याकडे पाहत होतो. सुरुवातीला हा सवाल समजत नसल्यामुळे गोंधळ उडाला होता. पण, नंतर लक्षात आले की ही केवळ

दुसरीकडे, हिंदूस्तान टाईम्स शी बोलताना गिरीजा म्हणाल्या, मला खूप मजा आली! रविवारी संध्याकाळी माझा फोन सतत वाजत होता. मी माझ्या नाटकाच्या रिहर्सलमध्ये होते. म्हणून फोन उचलू शकत नव्हते. अचानक सर्व मित्र मला मेसेज करत होते, ‘तुला माहिती आहे का X वर काय चाललं आहे?’

गिरीजाचा हा व्हिडिओ आणि मजेशीर किस्सा सोशल मीडियावर यांच कारणामुळे व्हायरल होत असल्याचे बोललं जात आहे. गिरीजा ओकच्या निळ्या साडीतील स्टाइल आणि विनोदी व्यक्तिमत्वामुळे ती राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे.

ती सध्या काय करतेय ?

गिरीजा ओक पुढील वेब सीरीज Therapy Sherapy मध्ये दिसणार आहे. त्यात तिनं सहकलाकार गुलशन देवैया याच्यासोबत काम केलं आहे. दोघांनी यात एक इंटिमेट सीन दिल्याचेही समजते.

गिरीजा ओक हीचा जन्म 27 डिसेंबर 1987 रोजी नागपूरात झाला. प्रसिद्ध मराठी अभिनेता गिरीश ओक यांची ती कन्या आहे. गिरीजानं मुंबईमधील ठाकूर कॉलेजातून बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली आहे. गिरीजानं वयाच्या 15 व्या वर्षीच मराठी चित्रपटात पदार्पण केलं होतं. अभिनयासोबतच ती थिएटर व विविध कार्यशाळांमध्येही सहभाग घेत असते. सन 2007 मध्ये आलेला ‘तारे जमीन पर’मध्ये गिरीजा ही आमिर खान सोबत दिसली होती. तर 2023 मध्ये आलेला ‘जवान’मध्ये ती शहारुख खान सोबत झळकली होती. त्याशिवाय, ती काही मराठी मालिकांमध्ये झळकली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!