पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सध्या ‘दोन रुपालीं’चा संघर्ष पहायला मिळत आहे. त्यात एका रुपालींचा लाड तर दुसऱ्या रुपालींचा छळ होतोय, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांची आधीच पक्षाच्या प्रवक्ते पदावरूव हकालपट्टी करण्यात ली असताना आत रुपाली चाकणकरांवर आणखी एक जबाबदारी टाकण्यात आली आहे. फलटणमधील एका महिला डॉक्टरच्या मृत्यूप्रकरणी उठवलेल्या प्रश्नांमुळे रुपाली पाटील यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. अजित पवार कुणाच्या बाजुने असा सवाल उपस्थित झाला आहे.
पक्षाच्या प्रवक्ते पदावरूव हकालपट्टीचा धक्का पचवत असतांनाच आता अजित पवार गटाने रुपाली ठोंबरेंना आणखी एक धक्का दिला आहे. निवडणूकीच्या काळात त्यांना महत्वाच्या जबाबदारीमधून डावलण्यात आलं आहे. त्याशिवाय त्यांच्या जागी रुपाली चाकणकरांना संधी देण्यात आली आहे. येऊ घातलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारी करत आहेत.
प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत 40 स्टार प्रचारकांची नोंदवण्यात आली. धक्कादायक म्हणजे या यादीमधून ठोंबरेंना वगळण्यात आलं आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर रुपाली ठोंबरेंना डावलण्यामुळे अजित पवार गटात ‘सगळं आलबेल’ नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. तटकरे यांनी जाहीर केलेल्या यादीत अनेक स्टार प्रचारकांच्या समावेश आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, तसेच मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
यादीत नवाब मलिक, धर्मराव आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रताप पाटील-चिखलीकर, अमोल मिटकरी, सना मलिक-शेख, समीर भुजबळ, इद्रीस नायकवडी, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, सिद्धार्थ कांबळे, सुरज चव्हाण, कल्याण आखाडे, सुनिल मगरे, नाझेर काझी, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर यांचाही समावेश करण्यात आला आहे.


