पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, लातूर जिल्हा बँकेत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.,
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड येथे क्लार्क / लिपीक /लेखनिक, शिपाई, / उप श्रेणी (बहुउद्देशीय सपोर्ट स्टाफ), वाहन चालक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 375 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : क्लार्क / लिपीक /लेखनिक, शिपाई, / उप श्रेणी (बहुउद्देशीय सपोर्ट स्टाफ), वाहन चालक.
– एकूण रिक्त पदे : 375 पदे.
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र राज्य.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2026.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://laturdccb.com/
अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


