Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राज्यात थंडीची लाट.. ! ‘या’ भागांत गारठ्याचा इशारा; काही तास धोक्याचे, अलर्ट जारी

राज्यात थंडीची लाट.. ! ‘या’ भागांत गारठ्याचा इशारा; काही तास धोक्याचे, अलर्ट जारी

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार कायम राहणार आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. 10 जानेवारी रोजी राज्यातील काही भागांमध्ये पहाटे आणि सकाळच्या वेळेत गारठ्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

कोकण विभाग
कोकणात आकाश प्रामुख्याने निरभ्र राहणार असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहणार असल्याचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात पहाटे थंडीचा जोर वाढणार आहे. पुणे शहरात सकाळी धुक्याची चादर पसरण्याची शक्यता असून किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस राहू शकते.

मराठवाडा
मराठवाड्यात सकाळी गारठा जाणवणार असून आकाश स्वच्छ राहील. छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांत तापमान तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ
विदर्भात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. सकाळी गारठा वाढेल, तर दिवसभर हुडहुडी जाणवण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत किमान तापमान 10 अंशांच्या आसपास घसरल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!