Ajit Pawar: मी इथे महापालिका लढवतोय, मी इथे झालेल्या चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म पाळला नाही असे होते का? असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तर कंठ फुटला या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरही त्यांनी पलटवार केलाय. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले कि, 9 वर्ष निवडणूक झाली नाही तर कंठ कसा फुटणार? असेही ते म्हणाले.
वर्ष निवडणूक झाली नाही तर कंठ कसा फुटणार?
पिंपरी चिंचवडम महापालिका निवडणुकीतील प्रचारात येथील भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातील वाद काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत, आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत, जन्मत:च लंगोट घालणारे आम्ही आहोत, असे म्हणत चॅलेंज दिले होते. अशातच, पिंपरीतील महेश लांडगे अन् अजित पवार यांच्यातील वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेत अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधाल होता. तसेच शेरो शायरीच्या माध्यमातून अजित पवारांवर टीका करत महेश लांडगेंनाही सल्ला दिल्याचे दिसून आलं. यावर आता अजित पवारांनी पुन्हा पुण्यातून पलटवार केलाय.
तो खूप मोठा आणि स्वयंपूर्ण आहे
उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत, अशी जहरी टीका भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली होती. त्यावर अजित पवारांनी चार शब्दांत विषय संपवला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा लांडगेंनी अजित पवारांना डिवचलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यात शिक्षा होणार असं म्हटलं अन् संध्याकाळी हे भाजपमध्ये दाखल झाले. आता देवा भाऊंनी इशारा दिल्यावर आपले घोटाळे काढणारे सुद्धा जमा होणारेत, असं म्हणत भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर असा निशाणा साधला.
दरम्यान, महेश लांडगे यांच्याबाबत अजित पवार म्हणतात, तो खूप मोठा आहे. तो स्वयंपूर्ण आहे. त्याचा बोलवता धनी कोणी नाही. भोसरीमधली लोक स्वयंपूर्ण, स्वयंभू असतात. असंही अजित पवार म्हणाले.
नेमकं काय घडलं होतं
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध अजित पवार गट असा थेट सामना बघायला मिळत आहे. इथं प्रचारसभेतून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जहरी टीका करताना दिसत आहे. अशातच भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांविरोधात थेट दंड थोपाटले आहेत. लांडगे यांनी अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका केली आहे. अजित पवार यांनी काही वर्षींपूर्वी विजय शिवतारे यांना उद्देशून आख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, मी ठरवलं तर एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. तू कसा आमदार होतो, तेच बघतो, अशी टीका केली होती. अजित पवारांच्या याच जुन्या वक्तव्याचा आधार घेत महेश लांडगे यांनी अजित पवारांची मिमिक्री करत जोरदार हल्लाबोल केला आहे.


