Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० अब्ज डॉलर्सची! देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुढील १० वर्षांचा विकास आराखडा

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० अब्ज डॉलर्सची! देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुढील १० वर्षांचा विकास आराखडा

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसराचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेता पुण्याचा विकास ‘ग्रोथ हब’ म्हणून केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या महाराष्ट्राचे सकल उत्पन्न ५८० अब्ज डॉलर असून त्यामध्ये पुण्याचा वाटा ७० अब्ज डॉलर आहे. मात्र पुण्याची खरी क्षमता २८० अब्ज डॉलरपर्यंत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘पुणेकरांशी संवाद’ कार्यक्रमात फडणवीस यांनी पुढील दहा वर्षांचा विकास आराखडा मांडला. वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि नगरनियोजनावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. पुणे ते मुंबईदरम्यान ‘ग्लोबल केपेबिलिटी सेंटर’चा (GCC) स्वतंत्र कॉरिडॉर उभारला जाणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.

पुढील पाच वर्षांत पुणे महापालिकेमार्फत ४४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मोफत मेट्रोच्या आश्वासनावर टीका करताना, पुणेकरांना मोफत सेवा नव्हे तर माफक दरात दर्जेदार सुविधा हव्या असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!