Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BJP vs Shivsena: कोपरखैरणे येथे भाजप आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; पैसे वाटल्याच्या आरोपातून शिवसैनिकाला मारहाण

BJP vs Shivsena: कोपरखैरणे येथे भाजप आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; पैसे वाटल्याच्या आरोपातून शिवसैनिकाला मारहाण

BJP vs Shivsena:मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चांगलीच रंगात आल्याचे पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यातील संघर्षामुळे हाणामारीच्या घटना घडत आहेत. गेल्या काही काळामध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात वाकयुद्ध झाले. ज्यामुळे नवी मुंबईत दोन्ही पक्षात वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज सोमवारी कोपरखैराणे येथे भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. गोष्ट थेट हाणामारीपर्यंत गेली.

कोपरखैरणे गावात पैसे वाटप

शिंदे गटाचा कार्यकर्ता कोपरखैरणे गावात पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपने केला. शिंदे सेनेचा हा कार्यकर्ता हातात सापडल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याला दोन्ही हात मागे पिरगळून धरले होते. कार्यकर्त्याला मारत होते. शिंदेंच्या कार्यकर्त्याचा फोन हिसकावून घेतला. त्यानंतर भाजपच्या एका कार्यकर्त्याने शिंदे सेनेच्या या कार्यकर्त्याचा गळा आवळला. आता या घटनेमुळे नवी मुंबईत भाजप आणि शिंदे गटातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लातूरमध्ये भाजपकडून पैसे वाटप

लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना वातावरण अधिक तापू लागले आहे. पैसे वाटपाच्या आरोपावरून प्रभाग क्रमांक 11 मध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. भाजपच्या एका उमेदवाराच्या नातेवाईकाला मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या उमेदवार व कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडल्याचा दावा केला आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित व्यक्तीने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून, “मी माझ्या वैयक्तिक कामासाठी बाहेर पडलो होतो. माझ्याकडे असलेले पैसे हे माझे स्वतःचे आहेत.

माझा कोणत्याही प्रकारे निवडणूक किंवा पैसे वाटपाशी संबंध नाही,” असा दावा केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीच्या खिशातून मतदारांची नावे तसेच उमेदवाराचे नाव लिहिलेली चिठ्ठी सापडल्याचा आरोप केला आहे. या प्रकारानंतर सदर व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे लातूर महापालिका निवडणुकीतील प्रचाराला आणखी धार चढली असून, पैसे वाटपाच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!