Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ZP Election Schedule : 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; वाचा पूर्ण वेळापत्रक

ZP Election Schedule : 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले; वाचा पूर्ण वेळापत्रक

ZP Election Announced : महानगरपालिका निवडणुकांनंतर आता राज्याचे लक्ष लागलेल्या ग्रामीण महाराष्ट्रातील सत्तेचा मुहूर्त अखेर ठरला आहे. राज्य निवडणूक आयोगाने १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल आज अधिकृतपणे फुंकले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत या निवडणुकांचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, ग्रामीण भागात आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे

  • मतदान तारीख: ५ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार)
  • मतमोजणी आणि निकाल: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० वाजल्यापासून)
  • उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत: १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
  • आचारसंहिता: १२ जिल्ह्यांत तात्काळ प्रभावाने लागू.

या १२ जिल्ह्यांत उडणार धुरळा

पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, तिथे निवडणुका होत आहेत. यामध्ये खालील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांचा समावेश आहे.

सुप्रीम कोर्टाचा आदेश आणि मुदतवाढ

राज्य निवडणूक आयोगाने प्रशासकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाकडे वाढीव वेळेची मागणी केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य करत १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या मुदतवाढीमुळेच आयोगाला ५ फेब्रुवारीची तारीख निश्चित करता आली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाचा पेच ५० टक्क्यांच्या वर आहे, तिथे दुसऱ्या टप्प्यात निवडणुकांचे नियोजन केले जाईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!