Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ! मतदानापूर्वी ‘वॉशिंग मशीन’ने भरलेला ट्रक जप्त; मतदारांना भुलवण्यासाठी उमेदवारांचा जुगाड?

पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ! मतदानापूर्वी ‘वॉशिंग मशीन’ने भरलेला ट्रक जप्त; मतदारांना भुलवण्यासाठी उमेदवारांचा जुगाड?

Pimpri Chinchwad Election 2026: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना, निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने रहाटणी भागात मोठी कारवाई केली आहे. मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेल्या तब्बल १९ वॉशिंग मशीन एका ट्रकमधून जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रार दाखल

निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाला १२ जानेवारीच्या रात्री साडेदहाच्या सुमारास रहाटणीतील गणराज कॉलनी येथे संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. पथक प्रमुख राहुल निकम यांनी तातडीने धाड टाकली असता, MH 14 KA 6330 क्रमांकाच्या गाडीमध्ये या मशीन आढळून आल्या. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

निवडणुकीत ‘भन्नाट’ ऑफर्सची चर्चा

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील श्रीमंत उमेदवारांनी यंदा विजयासाठी तिजोरीचे दरवाजे खुले केल्याचे दिसत आहे. वॉशिंग मशीनसोबतच इतरही अनेक धक्कादायक ऑफर्सची चर्चा सध्या रंगली आहे.

  • थायलंड टूर आणि जमीन: काही प्रभागांमध्ये मतदारांना चक्क ५ दिवसांची थायलंड सहल आणि एक गुंठा जमिनीचे आमिष दाखवले जात आहे.
  • हेलिकॉप्टर राईड: कसब्यात महिलांसाठी आयोजित पैठणीच्या खेळात चक्क हेलिकॉप्टर प्रवासाचे बक्षीस देण्यात आले.
  • लकी ड्रॉमध्ये प्लॉट: लोहगाव-धानोरी भागात ११ गुंठ्यांचे प्लॉट लकी ड्रॉद्वारे देण्याचे अजब आश्वासन एका उमेदवाराने दिले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या १२८ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडणार आहे. निवडणूक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी ‘एसएसटी’ आणि ‘व्हीएसटी’ पथकांना हाय अलर्टवर ठेवले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!