Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Iran Protests: इराणची परिस्थिती गंभीर ! मृतांचा आकडा 2500 च्या पुढे, भारतीय दूतावासाचा आपल्या नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना

Iran Protests: इराणची परिस्थिती गंभीर ! मृतांचा आकडा 2500 च्या पुढे, भारतीय दूतावासाचा आपल्या नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना

Iran Protests: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनामुळे सध्या इराणमध्ये कमालीची तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारविरोधी आंदोलनादरम्यान हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच खमेनेई यांनी अनेक आंदोलकांना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमेरिकाही इराणविरोधात कधीही लष्करी कारवाई सुरू करेल, असे दावे केले जात आहेत. या तणावपूर्व परिस्थितीमध्ये भारतीय दूतावासाने आपल्या नातेवाईकांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. सर्व भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर इराण सोडावं, अशी सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे. तसेच हा सल्ला विद्यार्थ्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांना देण्यात आला आहे.

भारतीय दूतावासाने तेहरानमधून प्रसिद्ध केलेल्या या सूचनेमध्ये म्हटले आहे की, इराणमधील बदलती स्थिती पाहता सद्यस्थितीत इराणमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना प्राप्त असलेल्या वाहतुकीच्या कोणत्याही साधनाच्या माध्यमातून इराण सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

सर्व भारतीय नागरिकांनी सद्यस्थितीत इराणमध्ये राहताना सावधगिरी बाळगावी, विरोधी आंदोलन किंवा संवेदनशील ठिकाणी जाणे टाळावे. तसेच इराणमध्ये भारतीय दूतावासाच्या संपर्कात राहावे आणि ताज्या घड्यामोडींबाबत जाणून घेण्यासाठी स्थानिक प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवावे, असे आवाहनही भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!