Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Kopargaon News: पिंपरीच्या अर्णवचा कोपरगावात घात! मामाच्या घरी संक्रांत साजरी करायला गेला अन् काळानं घाला घातला

Kopargaon News: पिंपरीच्या अर्णवचा कोपरगावात घात! मामाच्या घरी संक्रांत साजरी करायला गेला अन् काळानं घाला घातला

Kopargaon News: सण साजरा करण्यासाठी मामाच्या गावी गेलेल्या एका 14 वर्षीय मुलाचा पतंग उडवताना वीजप्रवाहाच्या धक्क्याने दुर्दैवी अंत झाला. मकर संक्रांतीच्या दिवशी कोपरगावमधील लक्ष्मीनगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. पिंपरी-चिंचवडचा रहिवासी असलेल्या अर्णव महेश व्यवहारे याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?

अर्णव संक्रांतीनिमित्त कोपरगावला मामाकडे आला होता. मंगळवारी तो आपल्या मित्रांसोबत घराच्या छतावर पतंग उडवत असताना, अचानक पतंगाचा मांजा किंवा अर्णवचा हात शेजारून जाणाऱ्या हाय व्होल्टेज वीज वाहिनीला लागला. विजेचा धक्का इतका भीषण होता की अर्णव जागीच बेशुद्ध होऊन कोसळला.

मित्रही गंभीर जखमी

या अपघातात अर्णवसोबत असलेला त्याचा मित्र ऋषिकेश वाघमारे (१९) हा देखील विजेच्या विळख्यात अडकला. तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नागरिकांनी दोघांनाही तात्काळ उपचारार्थ नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर अर्णवला मृत घोषित केले. ऋषिकेशवर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रशासनाकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. सणासुदीच्या दिवशी खेळता-बागडता मुलगा गमावल्याने व्यवहारे आणि वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पालकांसाठी धोक्याचा इशारा

राज्यात संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजा आणि वीज तारांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वीज वाहिन्यांच्या परिसरात पतंग उडवणे किती जीवघेणे ठरू शकते, याची ही भीषण प्रचिती आहे. मुलांच्या उत्साहावर पालकांचे नियंत्रण असणे गरजेचे असून मोकळ्या जागेतच पतंग उडवण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!