Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PMC Election Result 2026: मोठी बातमी! पुण्यात प्रशांत जगताप यांचा विजय, तर भाजपचे 3 उमेदवार विजयी

PMC Election Result 2026: मोठी बातमी! पुण्यात प्रशांत जगताप यांचा विजय, तर भाजपचे 3 उमेदवार विजयी

PMC Election Result 2026: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये पुणे शहरातून अत्यंत चुरशीचे कल आणि निकाल समोर येत आहेत. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत असून, पहिल्या निकालात भाजपने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे, काही दिग्गजांना विजयाचा आनंद आणि पराभवाचे दुःख एकाच वेळी पचवावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

बिबवेवाडीत भाजपचे वर्चस्व; राष्ट्रवादीचे गौरव घुले विजयी

पुणे महापालिकेचा पहिला निकाल प्रभाग क्रमांक २० (शंकर महाराज मठ, बिबवेवाडी) मधून जाहीर झाला आहे. या प्रभागातून भाजपचे तीन उमेदवार राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, याच प्रभागात भाजपच्या पॅनलला सुरुंग लावत राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेचा यांचा पराभव करून विजय संपादन केला आहे.

हेही वाचा – PMC Election: पुण्याचा नवा ‘कारभारी’ कोण? निकालापूर्वीच पुण्यात भाजपच्या महापौरांचे बॅनर, कोणाचं नाव चर्चेत?

प्रशांत जगतापांचा विजय, आईचा पराभव

पुण्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या प्रभागात काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांनी आपला विजय निश्चित केला आहे. मात्र, जगताप यांच्यासाठी हा निकाल संमिश्र ठरला आहे; कारण त्यांचे स्वतःचे वर्चस्व सिद्ध झाले असले तरी त्यांच्या आईला मात्र या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

काँग्रेसचे खाते उघडले; बापट आणि मानकर यांची मोठी आघाडी

शहरातील मतमोजणीत काँग्रेसनेही आपली उपस्थिती दर्शवली असून, प्रभाग क्रमांक १८ मधून साहिल केदारी यांनी विजय मिळवत काँग्रेसचे खाते उघडले आहे. दरम्यान, प्रभाग २५ मध्ये भाजप उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट १३,९०० मतांनी, तर बापू मानकर १५,५०५ मतांनी आघाडीवर आहेत. स्वप्नाली पंडित यांनीही ५,३७४ मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे.

रुपाली ठोंबरे पिछाडीवर; ईव्हीएमवरून केंद्रात गोंधळ

प्रभाग २५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या आक्रमक नेत्या रुपाली ठोंबरे पाटील पिछाडीवर आहेत. मतमोजणी दरम्यान त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल येथील केंद्रावर मोठा गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. ईव्हीएम (EVM) मशीन बदलल्याचा गंभीर आरोप करत ठोंबरे यांनी आक्षेप घेतल्याने काही काळ मतमोजणी थांबवण्यात आली होती. त्यांच्या या पवित्र्यामुळे केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!