Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात मतमोजणी केंद्रावर हाय-व्होल्टेज ड्रामा! EVM बदलल्याचा आरोप करत रुपाली पाटील यांचा संताप; तासाभर मतमोजणी ठप्प

पुण्यात मतमोजणी केंद्रावर हाय-व्होल्टेज ड्रामा! EVM बदलल्याचा आरोप करत रुपाली पाटील यांचा संताप; तासाभर मतमोजणी ठप्प

PMC Result 2026: पुणे महानगरपालिकेच्या निकालाची चुरस शिगेला पोहोचलेली असतानाच, मतमोजणी केंद्रावर आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी ईव्हीएम (EVM) मशिन बदलल्याचा गंभीर आरोप केल्याने पुण्यातील ‘न्यू इंग्लिश स्कूल’ केंद्रावर जोरदार राडा झाला. या गोंधळामुळे मतमोजणी प्रक्रिया तब्बल एक तास थांबवावी लागली होती.

नेमकं प्रकरण काय?
प्रभाग क्रमांक २६ मधून निवडणूक लढवणाऱ्या रुपाली पाटील यांनी मतमोजणी सुरू असताना अचानक आक्षेप घेतला. केंद्रावरील काही मशिन्स बदलण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. रुपाली पाटील यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर जात जाब विचारला. रुपाली पाटील यांच्या आक्रमकतेनंतर केंद्राबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाने अखेर मध्यस्थी केल्यानंतर आणि मशिनची पडताळणी केल्यानंतरच मतमोजणी पुन्हा सुरू झाली.

पक्षांतर्गत संघर्ष आणि उमेदवारीचा पेच

रुपाली पाटील यांची ही निवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे .राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) त्या काहीशा अलिप्त होत्या. त्यांना स्टार प्रचारक आणि प्रवक्त्यांच्या यादीतूनही वगळण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी त्यांना पक्षाने ‘एबी फॉर्म’ दिला. तथापी, पक्षांतर्गत वादात रुपाली चाकणकर यांच्याशी त्यांचे खटके उडाले होते. यामुळे त्या शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या, मात्र अखेर त्यांनी घड्याळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवली.

पुण्याच्या राजकारणातील ‘फायरब्रँड’ नेत्या

मनसेमधून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या रुपाली पाटील यांनी २०२१ मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पुणे महापालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आजच्या राड्यामुळे पुण्याच्या निकालात आता ‘ईव्हीएम’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!