Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PCMC Election Results: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मुसंडी, तर पुण्यात 22 वर्षांच्या साई थोपटे यांची ऐतिहासिक विजय

PCMC Election Results: पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची मुसंडी, तर पुण्यात 22 वर्षांच्या साई थोपटे यांची ऐतिहासिक विजय

PCMC Election Results: महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल केली असून, पुण्यातही अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

पिंपरी-चिंचवड: भाजपकडून विरोधकांचा धुव्वा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण 128 जागांपैकी भाजपने तब्बल 77 जागांवर आघाडी मिळवत एकतर्फी वर्चस्वाकडे वाटचाल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 37 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे.

  • भाजप: 77 (आघाडी)
  • राष्ट्रवादी (अजित पवार): 37
  • शिवसेना (शिंदे गट): 10
  • राष्ट्रवादी (शरद पवार): 01
  • मनसे: 01
  • इतर: 02 विशेष म्हणजे, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षांना अद्याप खातेही उघडता आलेले नाही.

पुण्यात २२ वर्षांच्या नगरसेविका साई थोपटे यांचा विजय

पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 36 (क) मधून भाजपने एक नवा इतिहास रचला आहे. अवघ्या 22 वर्षांच्या साई थोपटे यांनी पहिल्याच निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला असून, त्या महापालिकेतील सर्वात तरुण महिला नगरसेविका ठरल्या आहेत. त्यांच्या या विजयाने युवा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

शरद पवार गटाला मोठा हादरा; दिग्गजांचा पराभव

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष सुभाश जगताप यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या अश्विनी कदम यांचाही पराभव झाला आहे. तसेच, काँग्रेस सोडून शिवसेनेत (ठाकरे गट) गेलेले आबा बागुल यांनाही मतदारांनी नाकारले आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या निकालात भाजपचे 19 उमेदवार विजयी झाले आहेत, तर काँग्रेसचे 3 आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 21 (मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क) मधून भाजपचे श्रीनाथ भीमाले आणि मनीषा चोरबले हे मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!