Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्याहून मालेगावकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात; ४ ठार, २० जखमी

पुण्याहून मालेगावकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात; ४ ठार, २० जखमी

Pune to Malegaon private bus accident in Nashik : पुण्याहून मालेगावकडे निघालेल्या खासगी ट्रॅव्हल बसचा नाशिक जिल्ह्यात पहाटे भीषण अपघात झाला. मालेगाव-मनमाड महामार्गावर वऱ्हाने गावाजवळ पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास बस आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू, तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हल बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. जोरदार धडकेचा आवाज दूरवर ऐकू आल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. काही वेळातच पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढत मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.

अपघातात मृत्यू पावलेले सर्व चार प्रवासी हे मालेगावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, बस आणि पिकअप यांच्यात धडक नेमकी कशी झाली, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!