Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का; बड्या नेत्यासह 300 कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरेंना मोठा धक्का; बड्या नेत्यासह 300 कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

Uddhav Thackeray Shivsena : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याच्या तयारीत आहे. मात्र, या निवडणुकांच्या अगदी तोंडावरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे गटाच्या मोठ्या फळीने शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब यांच्यासह सुमारे 300 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामध्ये युवा सेनेचे तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, माजी जिल्हा परिषद सदस्या योगिता परब, माजी शहरप्रमुख अजित राऊळ, माजी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हा पक्षप्रवेश सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यामुळे वेंगुर्ला तालुक्यात ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे.

शिंदे सेनेची ताकद वाढणार

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घडामोडीमुळे शिंदे शिवसेनेची ताकद सिंधुदुर्ग जिल्ह्यात लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकांनंतर आता ग्रामीण भागातील सत्तासंघर्षाला वेग आला असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये नेमकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!