Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे ग्रँड टूरला उद्यापासून सुरुवात; बंडगार्डन ते नांदेड सिटीदरम्यान वाहतुकीत बदल, जाणून घ्या, बंद अन् पर्यायी मार्ग

पुणे ग्रँड टूरला उद्यापासून सुरुवात; बंडगार्डन ते नांदेड सिटीदरम्यान वाहतुकीत बदल, जाणून घ्या, बंद अन् पर्यायी मार्ग

Pune Grand Tour 2026 : पुणे शहरात बजाज पुणे ग्रँड टूर 2026 अंतर्गत स्टेज-२ सायकल स्पर्धेचे आयोजन उद्या (दि. 21) करण्यात आले आहे. या स्पर्धेला लेडीज क्लब, ब्ल्यू नाईन चौक, बंडगार्डन येथून सुरुवात होणार असून, लष्कर, वानवडी, कोंढवा मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत प्रवेश करत स्पर्धेचा समारोप नांदेड सिटी येथे होणार आहे.

या स्पर्धेमुळे संबंधित मार्गांवरील वाहतूक दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. मात्र, कोणताही रस्ता 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बंद राहणार नाही (स्पर्धेचा प्रारंभ व समारोप वगळता), अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली आहे.

स्पर्धेचा सुरुवातीचा पॉईंट लेडीज क्लब, ब्ल्यू नाईन चौक, बंडगार्डन येथे असून किराड चौक ते लेडीज क्लबदरम्यानचा रस्ता सकाळी 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच स्पर्धेचा शेवट नांदेड सिटी मेन गेट येथे होणार असल्याने सिंहगड रोडवरील नांदेड सिटी मेन गेट समोरील रस्ता कार्यक्रम संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, स्पर्धेच्या मार्गावर कोणतीही वाहने उभी करू नयेत. स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या बॅरिकेड्स व स्टॉप लाईनच्या मागे उभे राहून सुरक्षित अंतर राखावे.

बंद रस्ते आणि पर्यायी मार्ग

1) लेडीज क्लब (सुरुवात)

  • बंद मार्ग: ब्ल्यू नाईल हॉटेल परिसर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक
  • पर्यायी मार्ग: कोयाजी रोड मार्गे एम.जी. रोड

2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ते गोळीबार मैदान चौक

  • बंद मार्ग: आंबेडकर पुतळा चौक – खाण्या मारुती चौक – गोळीबार मैदान चौक
  • पर्यायी मार्ग: भैरोबा नाला – दुल्हा नगर चौक – गंगाधाम चौक मार्गे वाहतूक वळवली जाईल

3) गोळीबार मैदान चौक ते शितल पेट्रोल पंप चौक

  • बंद मार्ग: गोळीबार मैदान – मुल्ला नगर – ज्योती हॉटेल चौक – शितल पेट्रोल पंप
  • पर्यायी मार्ग: मंमादेवी चौक – भैरोबा नाला – गंगाधाम
  • कौसरबाग – गंगा सॅटेलाइट सोसायटी – नेताजी नगर
  • सेवन लॉज – गंगाधाम – लुल्ला नगर

4) शितल पेट्रोल पंप ते खडी मिशन चौक

  • बंद मार्ग: शितल पेट्रोल पंप ते खडी मिशन चौक
  • पर्यायी मार्ग: कान्हा हॉटेल – गंगाधाम चौक – लुल्ला नगर

5) खडी मिशन चौक ते ट्रिनिटी कॉलेज – बोपदेव घाट

  • बंद मार्ग: खडी मिशन चौक – येवलेवाडी – बोपदेव घाट
  • पर्यायी मार्ग: हडपसर – सासवड – कात्रज – शिंदेवाडी मार्ग

6) खडकवासला ते किरकटवाडी

  • बंद मार्ग: खडकवासला – सिंहगड रोड – किरकटवाडी
  • पर्यायी मार्ग: पानशेत रोड

7) किरकटवाडी ते नांदेड सिटी

  • बंद मार्ग: किरकटवाडी ते नांदेड सिटी
  • पर्यायी मार्ग: एमडीए लिंक रोड – एनडीए शिवणे रोड – वडगाव धायरी

8) नांदेड सिटी गेट

  • बंद मार्ग: वारजे ब्रिज ते नांदेड सिटी

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील शाळांना सुट्टी

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या मार्गावर येणाऱ्या भागांमध्ये वाहतूक बदल होणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील सर्व सरकारी व खाजगी शाळांना उद्या (दि. 21) सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!