मुंबई : बॉलिवूडमधला दबंग स्टार सलमान खान अनेकदा चर्चेत असतो. त्यानंतर आता त्याचा भाऊ सोहेल खान चर्चेत आला आहे. सीमा सजदेह एकेकाळी खान कुटुंबातील घटक होती. तिने १९९८ मध्ये सोहेल खानशी लग्न केले. मात्र, २४ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर सीमाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.
सीमा सजदेहने आता सोहेल खानसोबतच्या तिच्या दीर्घकालीन वैवाहिक जीवनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. तिने ब्रेकअपची कारणे आणि घटस्फोटातून तिने कोणते धडे शिकले याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. आम्ही दोघेही लग्न केले तेव्हा खूप लहान होतो. मी फक्त २२ वर्षांची होते. जसजसे आम्ही मोठे होत गेलो तसतसे आमचे मार्ग वेगळे होत गेले. आमचे विचार बदलले. अखेर आम्ही नवरा-बायकोपेक्षा चांगले मित्र आहोत, असे आम्हाला कळले. रोज भांडण्यापेक्षा वेगळे होणे चांगले होते.
दरम्यान, आम्हाला घरातील वातावरण खराब करायचे नव्हते. भांडण्यापेक्षा वेगळे होणे चांगले होते. आम्ही शांततेने वेगळे झालो, पण फक्त पती-पत्नी म्हणून. आम्ही अजूनही कुटुंबासारखे आहोत. तो माझ्या मुलांचा बाप आहे आणि ते कधीही बदलू शकत नाही.


