Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Deool Band 2 Collection : स्वामींची कृपा अन् बॉक्स ऑफिसवर धडाका! ‘देऊळ बंद २’ची १०० कोटींच्या दिशेने वेगवान घोडदौड

Deool Band 2 Collection : स्वामींची कृपा अन् बॉक्स ऑफिसवर धडाका! ‘देऊळ बंद २’ची १०० कोटींच्या दिशेने वेगवान घोडदौड

Deool Band 2 Collection : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या देऊळ बंद २ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत ५० कोटींचा टप्पा पार केला असून आता १०० कोटींच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली आहे.

शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडित कथा आणि स्वामी भक्तीचा संगम असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामींची भूमिका साकारली असून अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी शेतकरी महिलेची भूमिका साकारली आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार, प्रदर्शनाच्या १३व्या दिवशी चित्रपटाने १,९२५ शोजमधून २.३५ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाची एकूण नेट कमाई ४९ कोटी रुपयांवर पोहोचली असून ग्रॉस कलेक्शन ५७.६३ कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट राजा शिवाजी या बहुचर्चित चित्रपटालाही जोरदार टक्कर देताना दिसत आहे.

पहिल्या आठवड्यापासूनच ‘देऊळ बंद २’ने सातत्याने कोटींच्या घरात कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची पकड कायम राहिल्याने आगामी दिवसांत १०० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या दृश्यामुळे ‘देऊळ बंद ३’चीही जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेता गश्मीर महाजनी याची राघव शास्त्री म्हणून झालेली एंट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. ‘देऊळ बंद ३ : आत्मनिर्भर भारत’ या नावाने पुढचा भाग येणार असल्याचे संकेत चित्रपटाच्या शेवटी देण्यात आले आहेत.

‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’ आणि ‘धर्मवीर २’नंतर प्रवीण तरडेंच्या आणखी एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!